जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांच्या मुदतीत वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. यामधील एक गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्ये रेल्वेने पुणे-अमरावती द्विसाप्ताहिक व लोकमान्य टिळक टर्मिनन्स-बल्लारशाह या साप्ताहिक विशेष गाड्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २९ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष आता १ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष आता २ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या अप १४ व डाऊन १४ अशा एकूण २८ फेऱ्या होणार आहेत.

यासोबतच २६ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्हारशाह साप्ताहिक विशेष ३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०११२८ बल्हारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या अप ७ व डाऊन ७ अशा एकूण १४ फेऱ्या होणार आहेत.

ओखा-मदुरै एक्स्प्रेसच्या आणखी २६ फेऱ्या
दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या ओखा-मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ व २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर सोमवारी रवाना होणाऱ्या ०९५२० ओखा-मदुरै एक्स्प्रेसच्या २ ऑक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधित १३ फेऱ्या होणार आहेत. तर दर शुक्रवारी रवाना होणाऱ्या ०९५१९ मदुरै-ओखा एक्स्प्रेसच्या ६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधित १३ फेऱ्या होणार आहेत. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button