---Advertisement---
जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा! भुसावळमार्गे धावणाऱ्या बडनेरा- नाशिक मेमूसह अनेक गाड्यांना मुदतवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२३ । मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आगामी नाताळ व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यात बडनेरा – नाशिक – बडनेरा मेमू, नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेससह पाच विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ दिली. यामुळे भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.

train jpg webp webp

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११३९ नागपूर – मडगाव विशेष आता ३० मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११४० मडगाव – नागपूर विशेष ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ०१४३९ पुणे – अमरावती द्विसाप्ताहिक विशेष आता ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१४४० अमरावती – पुणे विशेष १ एप्रिल २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्याही अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

---Advertisement---

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष आता १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, ०२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

०२१४४ नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, तर ०२१४३ पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १७ फेब्रुवारी २०२४पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

बडनेरा – नाशिक – बडनेरा मेमूच्या १८२ फेऱ्या वाढल्या
बडनेरा ते नाशिक या दोन स्थानकांदरम्यान धावणऱ्या बडनेरा – नाशिक – बडनेरा विशेष मेमूच्या १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत १८२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या ०१२११ बडनेरा – नाशिक विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१२१२ नाशिक – बडनेरा विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---