---Advertisement---
बातम्या वाणिज्य

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, आता शेवटची तारीख काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२४ । राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै होती. मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा अर्ज भरला नाहीय. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी विलंब झाला आहे. हीच अडचण लक्षात घेऊन, सरकारकडून पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Yojana jpg webp

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे पीक विमा अर्ज भारण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. ज्यास केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, आता राज्यातील शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२४ पर्यंत पीक विमा योजनेसाठी आपला अर्ज करता येणार आहे.

---Advertisement---

काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना?
शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. कधी दुष्काळ, अवर्षणाची स्थिती असते. कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना राबविली जात आहे. यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.

कोणत्या परिस्थितीत मिळते नुकसान भरपाई?
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दुष्काळ, चक्रीवादळामुळे झालेले पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, महापुराने पिकाचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ, कीड प्रादुर्भावामुळे पिकाचे झालेले नुकसान, चक्रीवादळ अशा संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै मुदतवाढ देण्यात आली असल्याचे ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---