गुन्हेजळगाव शहर

तलवारीने केक कापणे पडले महागात ! ‘बर्थ डे बॉय’ला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । वाढदिवसाच्या पार्टीत तलवारने केक कापणे ‘बर्थ डे बॉय’ला चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’ गाण्यावर नाचत तलावरीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. जोशात असलेल्या या बड्डेबॉयला वाढदिवसाची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली.

याबाबत असे की, पंकज भानुदास चौधरी (वय २४) याचा वाढदिवस होता. जळगाव शहरातील चौगुल प्लॉट भागात त्याचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी डीजेच्या तालावर ‘भाईचा बड्डे’ गाण्यावर नाच करणाऱ्या पंकजला मित्रांनी डोक्यावर उचलून घेतले. नाचत असताना पंकजच्या हातात तलवार देखील दिली. मग जोशात आलेल्या या ‘बर्थ डे बॉय’ने देखील तलवार हवेत भिरकवायला सुरुवात केली. दोघा मित्रांनी हातात केक घेऊन पंकजपर्यंत पोहोचवला. पंकजने नाचत असतानाच तलवारीने केक कापला. हा सर्व प्रकार वाढदिवसाला हजर असलेल्या तरुणांनी मोबाइलच्या कॅमेरात चित्रीत केला होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियातून इतरत्र पोहोचवला गेला. त्यातील काही जणांनी हा व्हिडिओ पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी लागलीच या प्रकाराची माहिती काढली. व्हिडिओमधील ‘बर्थ डे बॉय’ पंकजची ओळख पटवण्यात आली. पोलिस पथकाने पंकज चौधरी याला लगेचच अटक केली. त्याच्याकडील तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button