जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । तालुक्यातील शिरसाेली येथील धामणगावात एनसीडी कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील रुग्णांचे तालुकास्तरीय शिबिर प्राधमिक आराेग्य केंद्रात घेण्यात आले. यावेळी २०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. सरपंच गोकुळ सपकाळे यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ करण्यात आला. महिलांचा गर्भाशयाचा कर्करोग, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, रक्ताशय व इतर आजारांच्या २०५ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. शिबिरातील आरोग्य पथकात सर्वसमुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, बी.सी.एम. दीपक देवगिरे, गटप्रवर्तक, आशा सेविका व शिपाई, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील वैद्यकीय पथक सहभागी होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर प्रमुख व वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले तसेच डॉ. अजय सपकाळ, डॉ. अश्विनी विसावे, डॉ. वृषाली पवार, प्रियंका मंडावरे, राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, व्ही. टी. महाजन, प्रतिभा चौधरी, नीलेश पाटील, चंद्रकला साठे, आदिंनी परिश्रम घेतले.