जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांचा सहभाग हवा असे प्रतिपादन डॉ.सुहास पिंगळे यांनी व्यक्त केले. डॉ.उल्हास पाटील गोदावरी फाउंडेशनला नुकतीच आय एम ये कडून भेट देण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगीआय एम ये चे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे बोलत होते.
पुढे बोलताना डॉक्टर सुहास पिंगळे व सचिव डॉक्टर मंगेश पाटे यांनी आय एम ए कडून घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन आपण सगळ्यांनी सोबत मिळून काम करावे व डॉक्टरांशी निगडीत जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हिरीरीने साथ द्यावी अशा सूचना देखील केल्या. तसेच डॉक्टर उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या कामांचा गौरव केला व जळगाव आय एम ए पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील एसबीआय बोर्डाची कॉन्फरन्स घेण्यासाठी परवानगी द्यावी व त्यासाठी गोदावरी फाऊंडेशन व आय एम ए जळगाव पूर्ण तयारीनिशी त्याला यशस्वी करेल असे सांगितले. नवीन अध्यक्ष व सचिवांनी आपले मनोगत व्यक्त करून जळगाव आय एम ए येचा वारसा अजून जोमाने पुढे घेऊन डॉक्टरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊया असा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी आय एम ए सभासद नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.