जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । देशातील बहुतांश लोक हे भारतीय रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. कारण रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. यामुळे दररोज करोडो लोक रेल्वेनं प्रवास करत असता. रेल्वेने अगदी स्वस्तात आपण कुठेही सहज प्रवास करु शकतो. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक सोय-सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच आता IRCTC ने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची योजना आखली आहे. ती नेमकी काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत..
काय आहे IRCTC योजना?
अनेकदा आपल्या गावी किंवा लांब कुठे तरी जायचे असते परंतु, पैशांमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. अशातच रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता पैसे नसले तरी आपण ट्रेनचे तिकीट (Ticket) बुक करु शकतो ते कसे जाणून घेऊया
सर्वसामान्यासाठी ट्रेन हे सर्वात स्वस्त असे प्रवासाचे साधन आहे. अगदी कमी पैशात आपण कुठेही सहज प्रवास करु शकतो. दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशातच भारतीय रेल्वे प्रवशांच्या सोयीची व सुविधांची काळजी घेत असते.
जर तुमच्याकडे पैसे (Money) नसतील तर तुम्ही पैसे न भरता पेटीएम वरून ट्रेनची तिकीट बुक करू शकता. रेल्वेच्या या सेवेचे नाव बाय नाऊ पे लेटर असे ठेवण्यात आले आहे. माहिती देताना IRCTC ने सांगितले की पेटीएम पोस्टपेड सेवा आता रेल्वे अॅपमध्ये सक्षम करण्यात आली आहे. या सुविधेचा हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
कशी असेल सुविधा
भारतीय रेल्वेने पुरवलेल्या पेटीएम पोस्टपेड सेवेअंतर्गत प्रवासी कोणतेही पैसे न भरता तिकीट बुक करू शकतात.
लांबच्या प्रवासाचे तिकिटे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत याची प्रवाशांना चिंता करु नका.
जर तुम्हाला Paytm मध्ये Buy Now Pay Later कसे वापरायचे हे माहित नसेल, तर खाली देलेल्या स्टेप्स फॉलो करा
स्टेप बाय स्टेप बुकिंग प्रक्रिया
सर्व प्रथम, आपल्या स्मार्टफोनवर Google Play Store वरून IRCTC अॅप डाउनलोड करा आणि नंतर लॉग इन करा.
यानंतर तुम्ही तुमच्या प्रवासाचे नाव, तारीख, बोर्डिंग स्टेशनचे नाव भरा
आता तुम्हाला ज्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे त्या निवडा आणि बुकिंगसाठी पुढे जा
यानंतर तुम्ही पेमेंट सेक्शनमध्ये पोहोचाल, त्यानंतर तुम्हाला Buy Now Pay Later चा पर्याय दिसेल.
यानंतर तुम्हाला पेटीएम पोस्ट निवडा आणि तुमचे पेटीएम लॉग इन करावे लागेल
आता तुमच्याकडे व्हेरिफिकेशन कोड असेल, तो भरल्यानंतर तुमचे तिकीट बुक केले जाईल.