---Advertisement---
जळगाव जिल्हा

उन्हाची तीव्रता वाढली ; हतनूर धरणातून होतोय दररोज 25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत असून तापमानाने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या तापमानाचा परिणाम धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणातून दररोज 25 दलघमी असे बाष्पीभवन पाण्याचे होत आहे. हतनूर धरणात गतवर्षीपेक्षा यंदा २.०३ टक्के साठा कमी आहे. गतवषर्षापेक्षा तो कमी असला तरी उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

hatnur dam jpg webp

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील हातनुर धरण हे भुसावळ शहरासह विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्रांची तहान भागवते. त्या दृष्टीने पाण्यासाठी महत्वपूर्ण स्त्रोत आहे. या धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती अवलंबून आहे शेती साठी सिंचन लागणारे पाणी देखील धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

---Advertisement---

हतनूर धरणातून यंदा सिंचनासाठी चार, तर व बिगर सिंचनासाठी दोन आवर्तने देण्यात आली. उर्वरित आवर्तने मागणीवर अवलंबून राहणार आहे. यानंतर हतनूर धरणाच्या सोमवार, 10 मार्च 2025 रोजी पाण्याची पातळी 212.550, साठा 306.50 जिवंत साठा 173.50, टक्केवारी 68.4 अशी आहे.2024 मध्ये हतनूर धरणाचे 10 मार्च 2024 रोजी २१२.६९० साठा 312.60 जिवंत साठा 179.60 व टक्केवारी 70.43 होती.गतवर्षीच्या तुलनेत गेल्या पावसाळ्यात धरणात जास्त पाण्याची आवक झाली.

गेल्या वर्षीपेक्षा पाणी पातळी 0.14 मिलिमीटरने कमी होता. साठा 6.1 ने जिवंत साठा पण 6.1 ने तर टक्केवारी 2.39 ने कमी यावर्षी आहे.2025 मध्ये एक मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे बाष्पीभवन 25 ते 26 दलघमी होत आहे. हेच बाष्पीभवन बुधवार, दि. 5 मार्चला 22 दलघमी झालेले आहे.तर 2024 मध्ये मार्च महिन्यात 1,6,8,9 रोजी 0.21 दलघमी तर दोन मार्चला 0.05 दलघमी पाण्याची बाष्पीभवन झाल्याची नोंद आहे.2024 या वर्षात 1 मार्च 0.21,2 मार्च 0.05, 3 मार्च 0.11, 4 मार्च 0.16, 5 मार्च 0.26, 6 मार्च 0.21,7 मार्च 0.26,8 मार्च 0.21,9 मार्च 0.21, 10 मार्च 0.26

2025 या वर्षात 1 मार्च 0.26, 2 मार्च 0.25, 3 मार्च 0.25, 4 मार्च 0.25, 5 मार्च 0.22, 6 मार्च 0.25, 7 मार्च 0.25, 8 मार्च 0.25, 9 मार्च 0.25, 10 मार्च 0.25 याप्रमाणे बाष्पीभवन धरणातील पाण्यातून होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 22 ते 26 दलघमी बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात नैसर्गिक घट सहन करावी लागत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment