जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । मार्च महिना अद्याप सुरु झालेला नसून तोवर तापमानाने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. भुसावळ तालुक्याचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून ३८ अंशांवर आहे. तापमान वाढल्यामुळे हतनूर धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. १८ व १९ फेब्रुवारीला धरणातील ०.३५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले. गेल्या वर्षी १८ व १९ फेब्रुवारीला ०.३० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले होते.
मे महिन्यात बाष्पीभवन प्रमाण वाढीचा धोका गेल्या वर्षों मार्च महिन्यात तापमान वाढल्याने धरणातून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले होते. यंदा फेब्रुवारीपासून हा प्रकार सुरू झाला, त्यामुळे आगामी एप्रिल व मे महिन्यात तापमान ४४ अंशांवर पोहोचल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण वाढेल, पारा ४५ ते ४६ अंशांवर गेल्यास पंधरवडधाला ७ दलघमीपर्यंत बाष्पीभवन होईल, असा अंदाज आहे.
गेल्या मान्सून हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हतनूर धरणात उशिरापर्यंत पाण्याची आवक होती. यामुळे रब्बी व पिण्यासाठी आवर्तन सोडूनही धरणात गतवर्षीपेक्षा तीन टक्के जास्त साठा आहे. यामुळे उन्हाळ्यात मागणीनुसार पाणीपुरवठा करूनही पाऊस लांबला तरी धरणावर अवलंबून गावे व प्रकल्पांची तहान जुलैपर्यंत भागवली जाऊ शकेल अशी स्थिती आहे. असे असले तरी यंदा तापमान गतवर्षीपेक्षा सरासरी तीन अंशांनी जास्त असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून जलसाठा झपाट्याने कमी होण्याची भीती आहे. हतनूर कारण, केवळ रविवार व सोमवारी धरणातील ०.३४ दलघमी पाण्याची वाफ झाली. तापमान वाढताच बाष्पीभवन वाढून साठा कमी होईल.