⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | गुन्हे | जळगाव जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात; टँकरची दुचाकीला धडक, दोन जण ठार

जळगाव जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात; टँकरची दुचाकीला धडक, दोन जण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात दुचाकीस धडक देणाऱ्या भरधाव टँकरमुळे दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहरातील महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे.या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राजू भिला भोई (वय ४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) हे दोघेही साडूभाऊ होते. राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली होती आणि आज सोमवारी तिचा विवाह होणार होता. दरम्यान, रविवारी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना हा अपघात झाला.

टँकर (क्र.एम.एच १९/बी.पी. २००३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक दिली, ज्यामुळे राजू भोई हे जागीच ठार झाले, तर दीपक मोरे जखमी झाले. दीपकला तात्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टँकर पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे लग्न घरामध्ये शोककळा पसरली आहे आणि एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे मागणीसह आंदोलन केले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही महामार्ग क्रॉसिंगवर अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.