---Advertisement---
हवामान

खुशखबर! मान्सूनची अंदमानात एंट्री, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला धडकणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२३ । राज्यासह देशभरात वाढत्या तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले असून देशात मान्सून (Monsoon) कधी दाखल होणार याच्या प्रतीक्षेत आहे. जेणेकरून उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. अशातच मान्सून संदर्भात हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिली आहे.

monsoon jpg webp webp

मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच नैऋत्य मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात १९ मे रोजी आगमन झाले असून पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात,अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली.

---Advertisement---

दरम्यान, दरवर्षी मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो मात्र यंदा त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे.  त्यानुसार केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. परंतु हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.

जळगावात उकाडा आणखी वाढणार?
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. आज म्हणेजच 20 मे ते 24 मे पर्यंत तापमान 45 अंशापेक्षा राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार आहे. काल शुक्रवारी कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---