जळगाव लेखाधिकारी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत काढतात झोपा; व्हिडीओ व्हायरल
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले असून सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती बाबत निर्णय घेतला आहे. असे असतानाही जळगाव जिल्ह्यातील लेखाधिकारी कार्यालयात याचे पालन होत नसल्याची तक्रार भारत परेशवाल यांनी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडे केली आहे. सोबत व्हीडीओ देखील पाठवला आहे.
भारत परेशवाल काही कामासाठी सदर कार्यालयात गेले असता कर्मचारी उपलब्ध नसतात आणि अधिकारी तर मनाचे राजे असल्यासारखे वागताय. ते लेखाधिकारी, शिक्षण विभाग जळगाव येथे अर्ज देण्यासाठी गेले असता त्यांना अक्षरशः संबंधीतास चार पाच वेळा आवाज देऊन जागे करावे लागले. यावेळी त्यांनी कार्यालयात कोणीही उपलब्ध नसल्याचा व्हिडीओ बनविला आहे. त्यात सदर कार्यालयात अधिकारी गायब, फक्त एकच कर्मचारी आणि तोही निवांत झोपलेला दिसतोय, अशा आशयाची तक्रार रेशवाल यांनी मेलद्वारे केलेली असून त्याचा व्हिडीओ देखील पाठविला आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/206003914679560/