जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२५ । एकीकडे राज्यात १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार होती. मात्र, महावितरणने स्वस्त विजेला आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला. या स्थगितीमुळे राज्यातील महावितरणच्या ग्राहकांना पुढील आदेशापर्यंत सध्या सुरू असलेल्या दरानेच वीज बिल हाती येणार आहे. यातच महावितरणने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांची वीज महाग केली. इंधन समायोजन शुल्क (एफएसी) लावल्याने विजेचे बिल हे वाढून येणार आहेत

वर्गवारीनुसार असे आहे इंधन शुल्क
वर्गवारीनुसार, व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी १५ ते ३० पैसे, पथदिवे ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे अधिक इंधन शुल्क म्हणून द्यावे लागतील.
तर असे असेल वाढीव बिल ?
युनिट……. दर (रुपये)
० ते १०० – २५ पैसे
१०१ ते ३०० – ४० पैसे
३०१ ते ५०० – ५५ पैसे
५०० पेक्षा जास्त – ६० पैसे
विजेचे जुने दर काय?
० ते १०० युनिट- ४.७१
१०१ ते ३०० -१०.२९
३०१ ते ५०० -१४.५५
५०० पेक्षा जास्त- १६.६४