---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

शरद पवार गटाचे निवडून आलेले आमदार आमच्या संपर्कात; अनिल पाटीलांच्या दाव्याने खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२४ । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यातच अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी एक मोठा दावा केला.

anil patil 1 1 jpg webp webp

शरद पवार गटाचे विधानसभेवर निवडून आलेले काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा अनिल पाटील यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले आहेत. लवकरच ते आमदार आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको, असे पाटील म्हणाले. केवळ शरद पवार गटाचेच नाही तर काँग्रेस आणि उद्धवसेनेचे निवडून आलेले काही आमदारही अस्वस्थ झालेले आहेत. त्यातले काही आमदार आमच्याशी चर्चा करत आहेत. तुम्हाला चार महिन्यांनंतर याचे परिणाम दिसतील.

---Advertisement---

कारण मतदारसंघाचा विकास हवा असेल तर सत्तेसोबत जाणे कधीही चांगले असते याची जाण या आमदारांना आहे, असे पाटील यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आणि सरकार स्थापण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपर्कात असलेल्या आमदारांबाबत चित्र स्पष्ट होईल. येत्या चार महिन्यांत पाच ते सहा आमदार आमच्या पक्षात प्रवेश करू शकतात, आता नाव कुणाचे घेणार नाही, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---