---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावात पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले ; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन अज्ञात युवकांनी पोलिस असल्याची बतावणी करून सोन्याच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम घेऊन ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp webp

रामचंद्र चटरूमल पारप्यानी ( वय ६२, रा. सिंधी कॉलनी) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मंगळवारी दि.४ मार्च रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रस्त्याने मोटारसायकलवर जात असताना, ३० ते ४० वयोगटातील दोन अज्ञात युवक भेटले. तसेच दोन्ही युवकांनी आपण पोलिस असल्याची बतावणी रामचंद्र पारप्यानी यांच्याकडे केली. पुढील रस्त्याला पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्याचे दोन्ही युवकांनी पारप्यानी यांना सांगितले.

---Advertisement---

फिर्यादीने रुमालात २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट व ३० हजार रुपये रोख असा ऐवज फिर्यादीने दोन्ही युवकांकडे फिर्यादीच्या गाडीच्या डिकीत ठेवण्यासाठी दिला. मात्र, हा ऐवज गाडीच्या डिक्कीत ठेवल्याचे भासवून हा ऐवज घेऊन निघून गेले. फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पारप्यानी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment