---Advertisement---
गुन्हे भुसावळ

Bhusawal : तापी नदीत उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील अकलूद येथील प्रभाकर कडू पाटील हे ६५ वर्षीय पीठ गिरणी चालक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. बुधवारी (दि.१२) त्यांचा मृतदेह तापी पात्रात आढळला. याप्रकरणी फैजपूर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

tapi river jpg webp webp

भुसावळ शहरातील तापी पात्रात बुधवारी सकाळी प्रभाकर पाटील यांचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत बाहेर आला. ही माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस घटनास्थळी आले. पण, घटनास्थळ फैजपूर पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना कळवण्यात आले. फैजपूर येथून उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार मोती पवार, विकास सोनवणे यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढत यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.

---Advertisement---

रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वीच ते घराबाहेर पडले. बेपत्ता झाल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान बुधवारी तापीत त्यांचा मृतदेह आढळला. मृताच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. हवालदार मोती पवार यांच्या खबरीनुसार फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment