⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | एकनाथराव खडसे ईडी कार्यालयात दाखल

एकनाथराव खडसे ईडी कार्यालयात दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. ईडी कार्यालयात जाण्याआधी खडसे आज सकाळी पत्रकार परिषद घेणार होते.

परंतु त्यांची अचानक प्रकृती खालावल्यानं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे. यानंतर खडसे चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?, असा सवाल उपस्थित होत असताना एकनाथराव खडसे सकाळी अकराच्या सुमारास अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.

पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे.  ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना आज गुरुवार दि.८ जुलै सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे.

दरम्यान, यानंतर एकनाथराव खडसे चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.  परंतु खडसे यांनी चौकशीकामी ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. त्यानुसार ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.