---Advertisement---
राजकारण जळगाव शहर

.. हे तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम, मोदींच्या भाषणावर खडसेंचा खोचक टोला

---Advertisement---

जळगाव लाईजळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काँग्रेसवर (Congress) हल्ला चढवल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर आणि भाजपवर (BJP) टीकेची झोड उडवली आहे. अशातच मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Ekanthrao Khadse) यांनीही खोचक टोला लगावला आहे.

eknath khadse narendra modi jpg webp

देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.

---Advertisement---

चंद्रकांत पाटलांना आव्हान
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जमीन लाटण्याचं काम केलं या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आरोपावरून चंद्रकांत पाटलांना खेडसेंनी खुलं आव्हान देऊन टाकलं आहे. चंद्रकांत दादा त्यांच्या अनुभवातून बोलले असतील. मीही विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले. मी नेहमी पुराव्यानिशी बोललो. माझे चंद्रकांत पाटलांना आव्हान आहे त्यांनी पुराव्यानिशी बोलावे, असेही खेडसे म्हणाले आहेत.

काँग्रेसने कोरोनात मजुरांना तिकीटं देऊन कोरोना पसरवल्याचा थेट आरोप राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी केला. यावर बोलताना खडसे यांनी टोला लगावला. महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला हे मोदीजीं चे वक्तव्य म्हणजे खेदाची बाब आहे. पाकिस्तानमधून अतिरेकी येत आहेत ते थांबले नाहीत मोदींना असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मागच्यावेळी गोवा निवडणुकीचे चित्र वेगळे होते. गोव्यात इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. यावेळेस इतर पक्षाचा जोर गोव्यात जास्त आहे. भाजप विषयी नाराजी आहे. उत्पल पर्रीकरांनना तिकीट त्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असे भाकितही खडसेंनी केले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---