---Advertisement---
जळगाव शहर

आमदार असो की खासदार कारवाई होणारच : एकनाथराव खडसे

eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । बीएचआर प्रकरणात पुणे पथकाने जळगावात कारवाई करीत अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणाशी एका आमदाराचे नाव जोडले जात असून गोरगरिबांचे पैसे खाणाऱ्यांमध्ये आमदार असो किंवा खासदार त्यांच्यावर कारवाई होणारच असे सूचक वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव लाईव्ह न्यू सोबत बोलताना केले. तसेच या प्रकरणात आणखी काही नावे असल्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने ती बाहेर येतील असेही ते म्हणाले.

eknath khadse

बीएचआर प्रकरणात मोठा धमाका झाला असून एकाच दिवशी राज्यभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिग्गज चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून पथक जळगावात तळ ठोकून आहे. दरम्यान, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे याबाबत म्हणाले की, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पूर्ण पुरावे असल्याशिवाय चौकशीला येत नाही. 

---Advertisement---

आर्थिक गुन्हे शाखेचे पथक याप्रकरणी आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणेची मदत घेऊ शकतात. बीएचआरमध्ये अनेक गोरगरिबांनी पैसे गुंतवले असून या अटकसत्रनंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

चौकशीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील आणि त्याची विक्री करून काही रक्कम मिळेल अशी आशा ठेवीदारांना आहे. तपास यंत्रणेचा तपास योग्य पध्दतीने सुरू असून ज्यांनी जे-जे केले आहे ते त्यांना सांगावेच लागेल असेही, खडसे म्हणाले.

हे देखील वाचा : 

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

 

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील मैदानात ; घरकुलप्रमाणे त्रयस्थ अर्जदार म्हणून याचिका दाखल करणार

 

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---