---Advertisement---
राजकारण

एकनाथराव खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

eknathrao khadse meet sharad pawar
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली असून यावेळी जिल्ह्यातील घडामोडीबाबत राजकीय चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

eknathrao khadse meet sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली. ते रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर काल पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्येतीबाबत विचारपूस केली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होत असून जळगाव राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडींची या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---