---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

.. म्हणूनच जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडतंय ; एकनाथ खडसेंचा पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोक वर काढले दिसत असून काल बुधवारी रात्री भुसावळ शहरात गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आठ दिवसात खुनाची दुसरी घटना घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान अशातच माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केलेय. पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

khadse police jpg webp

जिल्ह्यात दिवसेंदिवस चोऱ्या, मारामारी, खुनी हल्लेसह अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहे. काल रात्री भुसावळ शहरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे.

---Advertisement---

मागील आठवड्यात जळगाव शहरात देखील अशीच घटना घडली आहे. एकंदर पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचा संगनमत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मी पोलीस अधीक्षकांची भेट घेत टोळी युद्ध, गुंडागर्दी जिल्ह्यात वाढली आहे यावर नियंत्रण मिळावा अस सांगितल्यानंतर पोलीस अधिक्षक एक शब्द देखील काढला नाही.यावरून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती बटिक झाली आहे हे दिसत आहे असेही खडसे म्हणाले.

यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हटले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---