---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । भाजपच्या वाट्यावर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

khadse on jpg webp

सोमवारी सायंकाळापासून मंगळवारी सायंकाळपर्यंत साधारण ५ वेळा मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले. “फोन करणाऱ्या व्यक्तीने दाउद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने मला धमकी दिली. आपकी कोई खैर नही, आपको मार देंगे, आपको मारना है, असं मला म्हटलं. सुरुवातीला मला वाटलं की, कुणी खोडसाळपणा करत असेल. पण त्यानंतर फोन येण्याचं प्रमाण वाढल्याने मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

---Advertisement---

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने खडसेंना सांगितले. पहिल्यांदा असा फोन आल्यानंतर खडसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आले. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने खडसेंना दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खडसेंना कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती. खडसे यांच्या नावाने अनंत पाटील आणि सुनील पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ठार मारण्याची धमकी असल्याची पोस्ट एका व्यक्तीने फेसबुकवर टाकली होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---