---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

नाथाभाऊंची महाजनांनी घेतली मुक्ताईनगर येथे भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरपवासी करणार असल्याची जोरदार चर्चा राज्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु असून यातच दरम्यान, एक मोठी बातमी समोर आलीय. जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. दोघांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

eknatha khadse

भाजप घरपवासीच्या चर्चेदरम्यानच गेल्या रविवारी रात्री अचानक एकनाथ खडसे दिल्लीला गेले होते. यामुळे भाजपच्या प्रवेश चर्चेला वेग आला होता. मात्र यावर बोलताना खडसेंनी सहकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल असं सूचक वक्तव्य केलं होता. मात्र तूर्तास भाजप प्रवेश करणार नसल्याचंही खडसे म्हणाले होते.

---Advertisement---

दिल्लीतून जळगावात आल्यावर एकनाथराव खडसेंनी आपल्या फार्म हाऊसवर काही निकटवर्तीय आणि सहकाऱ्यांशी गुप्त बैठक घेत चर्चा केली. याच दरम्यान, जळगावात परतल्यावर मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेऊन चर्चा केली आहे.

महाजन-खडसे भेटीमध्ये वेगळे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. महाजन खडसेंना आपल्या गळाला लावत शिवसेनेत प्रवेश करवून घेतात की महाजन स्वतःच खडसेंसोबत भाजपत जातात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना विजयी करण्यासाठी सुनील महाजनांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात लेवा पाटील समाजाची मते मोठ्या प्रमाणात असून खडसेंचे संबंध देखील इतर समाजात चांगले आहेत. एकनाथराव खडसेंच्या मर्जीतील मते करण पवारांच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---