⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रक्षा खडसेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? विचारले पण.. नाथाभाऊंचा गौप्यस्फोट

रक्षा खडसेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? विचारले पण.. नाथाभाऊंचा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. दरम्यान, भाजपकडून जळगाव आणि रावेर मतदारसंघाबाबत स्पष्टता झाली नसली रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापून भाजप नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेशाची चर्चा आहे. याच दरम्यान एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट उमेदवार देणार  असून या जागेसाठी रक्षा खडसे यांना मी स्वत: राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार का? असा प्रश्न विचारला. मात्र यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मी मरेपर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकत नाही, असे खडसे यांनी सांगितले.

त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या माहितीने रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेवर तूर्तास पूर्ण विराम मिळाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.