⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | आ.चंद्रकांत पाटलांच्या आरोपांमुळे खडसे कुटुंबीय अडचणीत? तब्बल 400 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप..

आ.चंद्रकांत पाटलांच्या आरोपांमुळे खडसे कुटुंबीय अडचणीत? तब्बल 400 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या 33 हेक्टर 41आर जमीनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणाची एसआयटीच्या (SIT) माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली.

आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा सनसनाटी आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

दरम्यान, या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच त्यांनी एसआयटीचे आश्‍वासन देखील दिले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.