---Advertisement---
मुक्ताईनगर महाराष्ट्र राजकारण

माझा राजीनामा घेतला, तसाच मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या ; खडसेंचा भाजपला सल्ला काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२२ । भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी एका तारांकित प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भूखंड घोटाळ्यात दोषी ठरवावं अशी मागणी केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी हल्ला चढविला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावणाऱ्या भाजपने शिंदे यांचा एनआयटी प्रकरणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

khadse and shinde 1 1 jpg webp

माझ्यावरही भूखंडाचा आरोप झाला होता. त्यावेळी माझा भूखंडाशी दुरान्वयानंही संबंध नव्हता. मी तो भूखंड खरेदी केला नव्हता. पैसे दिले नव्हते. मिटिंग घेतली होती. तरीही सत्तेचा दुरुपयोग केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला होता. नैतिक जबाबदारी स्वीकारून मला राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. नंतर ईडीही लावली होती.त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे खडसे म्हणाले.

---Advertisement---

एनआयटी प्रकरणात दुटप्पी भूमिका नको
एनआयटी भूखंड घोटाळाप्रकरणी भाजपने दुटप्पी भूमिका घेऊ नये. मला त्यावेळी राजीनामा द्यायला भाग पाडले होते. आता मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे. भाजपकडे नैतिकता हा विषयच नाही. ही लोक निगरगट्ट आहेत. नैतिकतेच्या आधारावर हे सरकार आलेले नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---