---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

या सरकारची परिस्थिती म्हणजे.. ; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल, काय म्हणाले वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारमधील आमदारांची बेरोजगारी कमी झाली मात्र राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली, असा घाणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

eknath khadse 1 jpg webp

नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी दोन बायका आणि फजिती ऐका, या मराठी चित्रपटाचा आधार घेतला. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. चोरी, दरोडे आणि इतर गुन्हे वाढत चालले आहेत. काय चाललंय या सरकारमध्ये ? हे तीन रंगाचं हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका…अशी आहे.

---Advertisement---

एकनाथ खडसेंनी आपल्या टीकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनाही सोडले नाही. ते म्हणाले, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर ते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील या सर्वांना एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---