⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा, पण.. एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा, पण.. एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत आज जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यादरम्यान, बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. पण माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला खडसे यांनी भाजपला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खडसे म्हणाले, कितीही खोदा, मात्र काही मिळणार नाही, सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं खडसे म्हणले.

यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही असे म्हणत खडसेंनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले. “माणसं खोक्यावर निवडून येतात यावर विश्वास नाही. तसेच विकासकामांवर निवडून येतात यावरही माझा विश्वास नाही. मी निवडून आलो का? असा प्रश्न उपस्थित करत परत मला उभ राहायचं आहे असं नाही असा भावना खडेसे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.