जळगाव जिल्हाजळगाव शहर
संपात सहभागी आठ कर्मचारी निलंबित
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । संपात सहभागी आठ कर्मचाऱ्यांचे महामंडळातर्फे ७ रोजी निलंबन केले. तसेच निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी महामंडळ प्रशासनातर्फे सोमवारपासून जळगावला सुनावणीसाठी बोलाविण्यात येत आहे. मात्र, दोन दिवसात १३१ पैकी फक्त १८ कर्मचारी सुनावणीला हजर झाल्याचे एसटी महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जळगाव विभागात आतापर्यंत ३३२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यातील १३१ कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जळगावला समक्ष सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, दोन दिवसात या सुनावणीला १३१ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी सुनावणीचा शेवटचा दिवस असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.