⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | बंद डंपरवर आयशर धडकला; २ मजुरांचा मृत्यू, ६ जखमी

बंद डंपरवर आयशर धडकला; २ मजुरांचा मृत्यू, ६ जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील मजुरांना ऊसतोणीडीसाठी घेऊन जात असलेला आयसर बंद डंपरवर जाऊन धडकला. या भीषण अपघातात २ मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार धानोरा ते भराडी गावाजवळ घडली आहे. कल्पना यमजी पवार (वय – २७, रा. मोहाडी) व प्रशांत विठ्ठल वाघ (वय – ३० रा. हनुमानवाडी) असे मृतांचे नावे आहेत. दरम्यान, या घटनेत पोलीसांनी चालकाला अटक केली आहे.

याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील लाख (तांडा), वरसाडे (तांडा), मोहाडी, हनुमानवाडी येथील २४ ते २५ ऊसतोड मजूर हे फलटन येथील निरा – भिमा सहकारी साखर कारखान्यासाठी २२ आक्टोंबर, शुक्रवारी रोजी पाहाटे दिड वाजेच्या सुमारास एका आयसरने निघाले. सकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान आयसर सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील धानोरा फाट्यावर पोहचला. त्यावेळी समोर रोडच्या कडेला बंद ढम्पर उभा होता. आयसर त्यावर जाहून धडक्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. यात कॅबिनमध्ये बसलेली कल्पना पवार व प्रशांत वाघ हे जागेवरच ठार झाले.

जखमी झालेल्यांचे नाव :

तर गाडीत बसलेले निलेश यमजी पवार (रा. मोहाडी ता. पाचोरा), अनिल तंवर (रा. कुऱ्हाड तांडा ता. पाचोरा), दादाभाऊ राठोड (रा. वरसाडे ता. पाचोरा), मोहन भिल रा. लाख (तांडा), रुखमाबाई पवार (रा. वरसाडे ता. पाचोरा), दादाभाऊ पवार (रा. वरसाडे ता. पाचोरा) हे सहा जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान मयतांचे शवविच्छेदन ही सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.

मयतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी मोहाडी येथील माजी सरपंच भिवा शंकर जाधव यांनी  निरा – भिमा सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे. दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे मोहाडी व हनुमानवाडी गावात शोककळा पसरली आहे.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.