धरणगावात आयशरची ट्रकला मागून जोरदार धडक ; तरुण चालक ठार

डिसेंबर 3, 2025 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील भोकणी नजीक आयशर गाडीने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात परराज्यातील एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. टुपाय कालिपदा दास (वय २४, रा. बेलदा, पश्चिम बंगाल) असे या अपघातात मयत झालेल्या तरुण ट्रक चालकाचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

टुपाय दास हा आयशर गाडी (क्र. डब्ल्यूबी ३३ एफ २९६३) चालवत होता. भोकणी गावाजवळ महामार्गावर त्याचे वाहन जात असताना, अचानक त्याने रस्त्यावर पुढे असलेल्या एका ट्रकला (क्र. एमएच १८ बीजी ०५७३) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आयशरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आणि चालक टुपाय कालिपदा दास याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र टुपाय दासला वाचवता आले नाही.

Advertisements

या घटनेनंतर टुपाय दासचा सहकारी विश्वजीत वासुदेव दास यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी, २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे हे करीत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now