जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ आणि खाद्य तेलातील महागाईने सर्वसामान्यांचे दैनंदिन बजेट कोलमडून टाकले आहे. गेल्या महिनाभरात खाद्य तेलाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, खाद्य तेलाच्या किमती कमी कारण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असली तरी तेलाच्या किमतीवर फारसा परिणाम झालेला नाही. महिनाभरात खाद्य तेलाच्या किमतीत सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षभरात तेल बियांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम खाद्य तेलाच्या उत्पादनावर झाला आहे. त्यातच तेलाची आयात महागल्याने आणि इंधन दरवाढीने वाहतूक खर्च परवडत नसल्याने खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
खाद्य तेलातील दरवाढीची केंद्र सरकारने राज्यसभेत माहिती दिली होती. अधिवेशनादरम्यान सरकारने दरवाढीचा लेखी माहिती सादर केली होती. मागील वर्षभरात सूर्यफुलाच्या किमतीत ४०.६ टक्के वाढ झाली. सोयाबीन तेलाच्या किमतीत ३७ टक्के वाढ झाली. वर्षभरात पामतेल ३५.३ टक्क्यांनी महागले असल्याचे सरकारने म्हटलं होते.
जळगाव मधील आजचे तेलाचे प्रति किलोचे दर :
पाम तेल – १४०
सूर्यफूल – १५०
सोयाबीन – १४३
शेंगदाणा – १६५
वनस्पति डालडा – १३०