---Advertisement---
भुसावळ

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे धक्के

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्याला शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी १०.३५ च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काहीशी खळबळ उडाली आहे.

bhukamp jpg webp webp

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप नेहमीच होत असतात मात्र शुक्रवारी सकाळी खराखुरा भूकंप झाला आहे. नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाण वेळ सकाळी १०.३५ वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे.

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
आज सकाळी 10.35 वा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. (MG3.3) नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत.

भूकंपा दरम्यान काय कराल ?

जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?
घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.

जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?
पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका.उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

भूकंपादरम्यान काय करावे ?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे ?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---