बडनेरा-नाशिक अनारक्षित गाडीचा कालावधी वाढवला ; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा

डिसेंबर 24, 2025 6:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनिक विशेष गाडीचा कालावधी वाढवला आहे. आता ही गाडी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावेल. सध्या ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने याआधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिसूचित केलेल्या या गाडीची मुदत वाढवली.

memu jpg webp

०९२११ बडनेरा – नाशिक रोड ही गाडी पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत धावणार होती. ती आता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज धावेल. ०१२१२ नाशिक रोड बडनेरा ही गाडी परतीच्या प्रवासासाठी सुद्धा १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धावेल. म्हणजेच दोन महिन्यात एकूण ५९ फेऱ्या होतील. कालावधीत वाढवताना या गाडीचे वेळापत्रक, डब्यांच्या संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Advertisements

यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही.जळगाव येथून नाशिक व शेगाव येथे जाण्यासाठी ही गाडी अंत्यत सोयीची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक यागाडीने प्रवास करीत असतात.

Advertisements

अशी आहे वेळ :
ही गाडी सकाळी १०.०५ वाजता बडनेरा येथून सुटते. १०.३० मूर्तिजापूर, १०.४९ बोरगाव, ११.०२ अकोला, ११.३३ शेगाव, दुपारी १२.०३ नांदुरा, १२.३८ मलकापूर, १.३७ बोदवड, ३.०५ भुसावळ, ३.३५ जळगाव, ४.०६ पाचोरा, ४.१९ कजगाव, सायंकाळी ४.३९ चाळीसगाव, ५.२० नांदगाव, ५.५० मनमाड, ६.०६ लासलगाव, ६.२५ निफाड, ७.०५ नाशिक रोड स्थानकावर येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now