---Advertisement---
जळगाव जिल्हा

खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून मध्य रेल्वेने धुळे-दादर (Dhule-Dadar Express) गाडीचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. ही गाडी आता २ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. सोबतच मनमाड येथून सुटणारी मनमाड-दादर या गाडीच्या कालावधीही दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे.

train 1 jpg webp

धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. पुढे या दोन्ही बोगी अमृतसर एक्स्प्रेसला जोडण्यात येत होत्या. मात्र लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे होते… हाल होऊ लागले त्यामुळे खासदार डॉ. भामरे यांनी सतत पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने धुळे-दादर एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर २९ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली.

---Advertisement---

ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावते. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून या रेल्वेला जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ पर्यंत पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. दरम्यान आता आगामी काळात असलेले सण, उत्सव लक्षात घेऊन रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा धुळे-दादर रेल्वेला २ जानेवारी २४ पर्यंत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ०१०६५ दादर- धुळे एक्स्प्रेस सोमवार, शुक्रवार व रविवारी तर ०१०६६ धुळे-दादर ही गाडी सोमवार गुरुवार व शनिवारी धावणार आहे.

दुसरीकडे मनमाड येथून सुटणारी ०२१०२ मनमाड – दादर विशेष गाडीचा कालावधीही दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. ही गाडी ४ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. तर ०२१०१ दादर – मनमाड विशेष गाडी ४ ऑक्टोबर ते ०१ जानेवारी २०२४ पर्यंत धावेल.

या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे रेल्वेने कळविले आहे.
आरक्षण: 02102/02101 आणि 01065/01066 विशेष ट्रेनच्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग 02.10.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या वेळा आणि थांब्यांबद्दल तपशीलवार माहितीसाठी www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in वर तपासा किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेने प्रवाशांना करीत सुविधेचा लाभ घ्यावा असे म्हटले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---