जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । शहरातील स्वातंत्र्य चौकात एका भरधाव डंपरने रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला धडक दिली. घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वृद्धाला तात्काळ उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
शहरातील स्वातंत्र्य चौकात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हा बस स्थानकाजवळ हमाली काम करणारे बुधा नन्नवरे (वय-६०) हे पायी चालत होते. बसस्थानकाकडून स्वातंत्र्य चौकाच्या दिशेने येत असलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. अपघातात बुधा नन्नवरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी योगेश पाटील यांच्यासह वार्डन उमेश ठाकूर यांनी त्यांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
शहरातील अपघातांची मालिका सुरूच असून जिल्हापेठ पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे. दरम्यान, डंपर अमृत योजनेच्या कामाचे असल्याचे समजते.