---Advertisement---
जळगाव शहर

जळगावात वादळामुळे सर्वत्र धुळचे साम्राज्य ; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२३ । जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान, आज दुपारी जळगाव शहरासह परिसरात वादळामुळे सर्वत्र धुळ पसरलेली होती.

dhul jalgaon jpg webp webp

अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जळगाव शहर आणि परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती. जोरदार वाऱ्यांमुळे जळगाव शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्य मानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. दरम्यान, या अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेकांना फटका बसल्याची शक्यता आहे.

---Advertisement---

मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून असह्य करणारा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा कधी मिळेल याची प्रतीक्षा जळगावकर करत आहे. दरम्यान, जळगावला आज रविवार पासून पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---