⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रक्षा खडसेंची उमेदवारी बदलणार? राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ…

रक्षा खडसेंची उमेदवारी बदलणार? राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । भारतीय जनता पार्टी (भाजप) ने लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला. दरम्यान. भाजपने जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र रक्षा खडसेंना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून रावेर लोकसभेत भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. आता यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रक्षा खडसेंसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.

संजय पवार नेमकं काय म्हणाले?
रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.

रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसापूर्वी भाजपच्या एका बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे आणि पदाधिकारी यांच्यात खडाजंगी झाल्याचं समोर आलं होते. यावेळी कार्यकर्त्याने रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करतात, असा आरोप केला होता.

आता यातच संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.