जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही जर राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. DTP Maharashtra Bharti 2023
पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 125 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
पदाचे नाव : शिपाई (गट-ड) / Peon (Group – D)
आवश्यक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असावा
विभागीय रिक्त पदांची संख्या :
1) कोकण 28
2) पुणे 48
3) नाशिक 09
4) छ. संभाजीनगर 11
5) अमरावती 10
6) नागपूर 19
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये पर्यंतचा पगार मिळेल. अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते मिळतील.
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 900/- रुपये]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
भरतीची अधिसूचना पहा : PDF
Online अर्ज: Apply Online