---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

---Advertisement---

समन्वय २०२३ स्नेहसमेलनाचा कलागंणातून प्रारंभ

GD prachin jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । भारतीय संस्कृती विविधतेने सजली असून भावी वैद्यकिय तज्ञांनी हया संस्कृतीचे आपल्या कलाकृृतीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात दर्शन घडवत समन्वय स्नेहसंमेलनाचा प्रारंभ कलांगणातून केला आहे.पुढील सात दिवसात विविध स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी समन्वयमधून बघायला मिळणार आहे.

---Advertisement---
new 2
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन 1

भावी वैद्यकिय तज्ञांचा कलाविष्कार अर्थात कलांगणचा प्रारंभ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,डॉ.प्रशांत गुडेटटी,कृषि महाविद्यालयाचे डॉ. एस एम पाटील, डॉ. भवानी वर्मा यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

new 1
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन 2

यावेळी विविध विभागाचे प्रमुख डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. मान्यवरांनी भावी वैद्यकिय तज्ञांमधील कलागुणांचे कौतुक केले. या कलांगणात मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील वेशभुषा परिधान केली होती याचबरोबर विविध प्रांतकला सादर केलेल्या आहे. हे प्रदर्शन मंगळवार दि.३० एप्रिल पर्यंत खुले ठेवण्यात आले आहे.

समन्वय स्नेहसंमेलनात २६ रोजी प्रॉम नाईट, होम बॅण्ड. दि २७ रोजी टीचर आणि जे आर नाईट,२८ रोजी डि.जे नाईट आणि फनफेअर, बुधवार दि.२९ रोजी कॉन्सर्ट आणि दि ३० रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. समन्वयचे आयोजक शौर्य २०२१ बॅचची टीम परिश्रम घेणार आहे. सुत्रसंचालन व आभार अपुर्वा पाटील आणि शर्वरी रेळे यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---