विविध क्षेत्रात उंचीवर पोहोचलेला नेता, मात्र राहणी अत्यंत साधी..!

फेब्रुवारी 12, 2026 11:04 AM

सहकार महर्षी पी. ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसाला डॉ. उल्हास पाटील यांनी दिली शुभेच्छापर भेट

tatyapatil

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आधारस्तंभ आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, माजी आमदार पी. ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी पी. ई. तात्या पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisements
image 1

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. वैभव पाटील आणि डॉ.राहुल पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पी. ई. तात्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, तात्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा आहे. मग तो सामान्य कार्यकर्ता असो वा मोठा नेता, प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. एवढी मोठी पदे भूषवूनही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे राहिले, म्हणूनच त्यांना खऱ्या अर्थाने ‘जनतेचा माणूस’ म्हटले जाते.

Advertisements

पी.ई. तात्या उर्फ पांडुरंग पाटील यांनी आयुष्यभर कापूस उत्पादक शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढा दिला. अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला धारेवर धरून सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले, अशा शब्दांत डॉ. पाटील यांनी त्यांच्या संघर्षाची आठवण करून दिली.

या भेटीदरम्यान जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही तात्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now