डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. भुसावळात क्रीडा दिन उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस. ई. स्कुल भुसावळ येथे क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, तसेच मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील उपस्थीत होते. विद्यार्थ्यांनी मशाल ज्योत पेटवून कार्यक्रमाची सुरुवात केली.
रेड, ब्ल्यू, , व यलो ग्रृप या चार गटात विभागणी करण्यात आली. त्यानंतर चार गटात स्पर्धा झाल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे ड्रील सादर केली. सुमारे १००० विद्यार्थ्यांनी ड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी डीयुपीईएमस शाळेचे नाव ड्रिल करून बनवले व कवायत सादर केली. नर्सरी ते इ. १० वी पर्यंत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खेळामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून पंजाबी, आसामी, राजस्थानी, केरला, महाराष्ट्र, गुजराथी, ओडीसा, कश्मिरी गीतावर पारंपारिक नृत्य सादर करून पालकांचे व उपस्थितांचे मन मोहुन टाकले.
प्रसंगी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम माजी खा. डॉ. उल्हास , सौ. अनघा पाटील यांच्या हस्ते पार पाडला. कार्यक्रमास सर्व पालकां, शिक्षकां व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले.