जळगांव : मंगळवार दि. १३ मे ला १० वी १२वी सीबीएसईचा निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदाने घवघवीत यश मिळालेले आहे.
१० वीचा निकाल
इयत्ता बारावी मध्ये आर्या पाटील ९५.८% प्रथम गार्गी राणे ९५.६% व्दीतीय तर किरण अत्तरदे ९२.४%, तन्वी चौधरी ९२% चौथी, तुलसी नारखेडे ९१.६ पाचवी आणि लेखा पाटील ९१.२ गुण प्राप्त करत सहावी आलेली आहे.
१२ वीचा निकाल
इयत्ता बारावी मध्ये चिन्मय नितीन महाजन ९४.६% प्रथम सत्यम गौरब कुमार ८६.६% व्दीतीय तर निहांशू सुनिल पाटील ७५.८% गुण प्राप्त करत तृतीय आलेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फौंडेशनचे सदस्य डॉ.केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई स्कूल सावदाचे 10वी, 12वी निकालात यश
