जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकतेच जाहीर झालेल्या बी.पी.टी. हिवाळी अंतीम वर्ष निकालात जळगावच्या गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाचा निकाल तब्बल ९१.१% लागला असून, बी.पी.टी. फायनल इयर परीक्षेत ज्योत सचदेव हिने ७१.६२% गुण मिळवून प्रथम,खुशी नवल ७०.७५% द्वितीय ,तर अन्विषा सांखे हिने ७०.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव वर्षा पाटील,संचालक डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रा. डॉ. जयवंत नगूलकर, प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमा सोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि संस्थेच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले, असे प्राचार्य नागुलकर यांनीम्हटले आहे.