जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या क्रिडा महोत्सवाचा आज समारोप करण्यात आला. तिन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध क्रिडा स्पर्धा जल्लोषात घेण्यात आलेल्या विजेत्यांना पारीतोषीक वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. महिला क्रिकेट स्पर्धा महिला क्रिकेट स्पर्धेत अराघ्या टीम विजयी ठरली. विजयी संघात भारती जगताप, श्रुती गेडाम, गौरी कुंभाळकर, तिलोत्तमा चौधरी, समीक्षा गोपाळ, तृप्ती पाटील, श्रद्धा भुतडा, ऋतुजा लोखंडे, हृतुजा इंगळे, आचल व निशा उईके याचा सहभाग होता.या संघाने उत्कृष्ट समन्वय आणि संघभावना दाखवत विजेतेपद पटकावले.पुरुष क्रिकेट स्पर्धा पुरुष क्रिकेटमध्ये रिसेनने शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले.

विजयी संघात नईम तडवी, ओम चौधरी, चंदन मौर्या, नौमान मुस्तफिज, हमजा सिद्दीकी, प्रणव मुखेडकर, आदित्य बच्छाव, रोहित मारू, प्रफुल पंचोदबरिया, जीत खत्री, फहीम खान आणि झैद शेख यांचा समावेश होता. खो-खो स्पर्धा खो-खो स्पर्धेतही रिसेनने विजेतेपद पटकावले. -दिव्या विशे, पूजा दानवे, सायली शेलके, साक्षी इंगळे, साक्षी खोंडले, तनिषा पवार, सानिका लाखोटिया, वैष्णवी सावंत व मिसबह यांचा समावेश होता. गोळाफेक स्पर्धा मुली गट विजेते: १) खुशी अर्जपुरे – ५.४ मीटर २) ट्विंकल माळी – ५.२ मीटर ३) वैष्णवी गुट्टे – ५.१ मीटर मुले गट विजेते: १) युवराज पाटील – ८.२ मीटर२) अंकित राऊत – ८ मीटर३) गणेश दुधाभाते – ७.७ मीटर, बॅडमिंटन स्पर्धा बॅडमिंटनमध्ये बार्ती शेजुळ आणि ट्विंकल माळी या जोडीने विजेतेपद पटकावले, तर समृद्धी आणि खुशी जोगे या जोडीने उपविजेतेपद मिळवले.







