⁠ 
सोमवार, मे 20, 2024

डॉ.केतकी पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने केला जाणार साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांचा बुधवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मात्र हा वाढदिवस पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेऊन साजरा केला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३५ विविध वृक्षांची लागवड डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते केली जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी सकाळी ५.३० वाजता डॉ.केतकी पाटील ह्या ओंकारेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहे. त्यानंतर जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथील निवास स्थानी सकाळी ६ ते ८ हितचिंतक व शुभेच्छूकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

त्यानंतर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. यात जामनेर तालुक्यातील नेरी येथे सकाळी ८.३०, जामनेर येथे १० वाजता, बोदवड येथे ११:३० वाजता, भुसावळ येथे दुपारी २, यावल येथे ३ वाजता व चोपडा येथे सायंकाळी ४.३० वाजता वृक्षारोपणाने डॉ.केतकीताईंचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजेनंतर पुन्हा भास्कर मार्केट येथील निवास स्थानी हितचिंतक व आप्तेष्ठांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.