⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जळगावातील युवा संवाद सभेला युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे – डॉ केतकी पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । देशाचे कणखर नेतृत्व तेजस्वी गृह व सहकार मंत्री अमित शाहा यांचा जळगाव जिल्हा दौरा ५ रोजी नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजपा नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून मंगळवार दि ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता सागर पार्क जळगाव येथे युवकांशी संवाद साधणार आहे.

या भव्य युवा संवाद सभेला उत्तर महाराष्ट्र विभागातीलसर्व खासदार,आमदार,पदाधिकारी व युवा नवमतदार युवक-युवती उपस्थित राहणार आहे. भारत तरुणांचा देश आहे. स्टार्ट अप आणि मेक इन इंडिया च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. सगळ्यांचे आपल्या नावाच्या पुढे मोदी केंद्र सरकार युवकांसाठी ध्येय धोरणे आखत असते. केंद्रीय गृहमंत्री ना. अमितजी शहा यांचे मार्गदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी स्त्रोत आहे.

या भव्य दिव्य युवा संवाद सभेसाठी जिल्हातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी केले आहे.