---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ.केतकी पाटीलांचे संपर्क अभियान; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सौ. केतकीताई पाटील यांनी आज भुसावळ तालुक्यातील तळवेल आणि खंडाळा येथे भेटी देऊन उपस्थित भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. या भेटीत संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा आलेख समोर ठेवून ‘अब की बार 400 पार’ चा नारा दिला.

ketki tai patil 1 jpg webp

यावेळी तळवेळ येथे उपस्थित काहूरखेडा ग्रामपंचायतचे तरुण ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. तर खंडाळा येथील युवा कार्यकर्ते हर्षल अशोक पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ.केतकी ताई यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

---Advertisement---

यांची होती उपस्थिती :
यावेळी तळवेल येथे माजी पंचायत समिती सभापती श्रीमती इंद्राबाई लक्ष्मण पाटील, माजी सरपंच ज्ञानदेव हरी झोपे, उपसरपंच अमोल पंढरीनाथ पाटील, विकास सोसायटीचे सदस्य अर्जुन ओंकार इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सोपान मुरलीधर पाटील, प्रतिष्ठित नागरिक डॉ.वराडे सर,बी टी इंगळे, आर.टी.पाटील,रमेश झोपे, ग्रामपंचायत सदस्य अशोक सोपान पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास प्रभाकर पाटील, किशोर वासुदेव पाटील, भास्कर एकनाथ पाटील, शंकर रमेश पाटील, गणेश चंद्रकांत पाटील, जनार्धन जगन्नाथ पाटील,नरेंद्र जगन्नाथ पाटील,भाऊराव नामदेव पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष केशव पाटील, जितेंद्र रामा पाटील, तुषार वासुदेव पाटील, नारायण राजाराम पाटील,गुणवंत यशवंत पाटील तर खंडाळा येथे माजी सरपंच प्रदीप वसंत पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण पंढरीनाथ चौधरी, अशोक पंडित पाटील, विजय नारायण पाटील, राजाराम अमृत पाटील, प्रेमचंद मोतीलाल पाटील,शंकर नामदेव पाटील, दिनेश वसंत पाटील, पंकज अशोक पाटील, प्रकाश सुखलाल चौधरी, श्री घुले सर, महेंद्र वसंतराव पाटील, ऋषिकेश महाजन आदींची उपस्थिती होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---