⁠ 
शनिवार, जून 22, 2024

वरणगाव भाजपा कार्यालयात डॉ केतकी पाटीलांचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी वरणगाव येथील बुथ क्रमांक 237 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थिती देत भाजपा कार्यालय वरणगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनीलभाऊ माळी,ता. सरचिटणीस रमेशभाऊ पालवे, ता. सरचिटणीस शामराव धनगर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश भाऊ चौधरी, ता. सरचिटणीस संतोषजी कश्यप, भाजपा कार्यकर्ते झोपे काका, बळीराम सोनवणे, शंकर अण्णा, सागर कोळी, नानाभाऊ सोनार,राहुल जंजाळे आणि अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.