जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्हयात नुकतेच सूरू झालेले गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक व आंतरविषय अभ्यासासाठी भेट दिली.
या भेटीचा उद्देश आयुर्वेद व आधुनिक नर्सिंग या दोन क्षेत्रांतील सुसंवाद वाढवून आरोग्यसेवेचे व्यापक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावून देणे हा होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नर्सिंग महाविद्यालयाच्या सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये सिम्युलेशन लॅब, ग्रंथालय, व वर्गखोल्यांचा समावेश होता. दोन्ही महाविद्यालयांच्या शिक्षकांनी आयुर्वेद व आधुनिक नर्सिंग पद्धतींतील एकत्रित उपयोग व तंत्र यावर चर्चा केली.
विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग शिक्षण आणि रुग्णांच्या संपूर्ण देखभालीत त्याच्या महत्त्वावर एक छोटेखानी सत्र आयोजित करण्यात आले.हा उपक्रम परस्पर शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरला व भविष्यात अशा भेटीतून सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.